
गाझा पट्टीत इस्रायल आणि हमास यांच्या सुरू असलेल्या युद्धात इस्रायलने शुक्रवारी केलेल्या जोरदार हवाई हल्ल्यात कमीत कमी 17 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये छोटी मुले आणि एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. हल्ल्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली. गाझा पट्टीत इस्रायलकडून हल्ल्यांवर हल्ले केले जात आहेत. शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात 17 लोकांपैकी काही मृतदेह जबालिया येथील शिबिरात आणले गेले.