गाझामधील 15 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध समाप्त करण्याच्या उद्देशाने झालेल्या युद्धविराम कराराचा भाग म्हणून हमासने शनिवारी चार महिला इस्रायली सैनिकांची सुटका केली. या सैनिकांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायल आपल्या तुरुंगात बंदिस्त असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल. मात्र किती कैद्यांची सुटका होणार याबाबत अद्याप कोणतीही आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र एएफपीच्या वृत्तानुसार, ही संख्या 200 च्या आसपास असू शकते.
एएफपीच्या वृत्तानुसार, चार सैनिकांना गाझामधील रेड क्रॉसकडे सोपवण्यात आले आहेत. करीना अरिव्ह, डॅनिएला गिलबोआ, नामा लेव्ही आणि लिरी अल्बाग, असं सुटका करण्यात आलेल्या सैनिकांची नावे आहेत. या चौघांच्या बदल्यात इस्रायल 200 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार आहे, असं वृत्त आहे.