![gold mine](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/gold-mine-696x447.jpg)
अवैधरित्या खणन सुरू असताना सोन्याची खाण कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून 48 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आफ्रिकन देश पश्चिमी माली येथे ही घटना घडली. बचावकार्य अद्याप सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सोने उत्पादकांपैकी माली हा आफ्रिकेतील आघाडीचा देश आहे.
सदर खाणीत एका चिनी कंपनीद्वारे खणन केले जात होते. मात्र सध्या ही खाण बंद करण्यात आली होती. बंद खाणीत अवैधरित्या सोने खणन करण्याचे काम सुरू होते. यादरम्यान अचानक खदान कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्घनेत मृत्यू झालेल्यांमध्ये एका महिला आहे, तिच्या पाठीवर तिचे बाळही होते.
दुर्घटनेत काही कामगार पाण्यात पडले. आपत्कालीन पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.