झेलेन्स्कीवरील टीका आवडली नाही – ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनच्या नेत्यांबद्दल निराशा व्यक्त करताना व्लादिमीर पुतीन आणि वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यावर टीकास्त्र सोडले. दोन्हीही देश युद्धविराम करारासाठी संघर्ष करत आहेत. आम्ही प्रयत्न करत असलो तरी पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यात प्रचंड द्वेष आहे. पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या नेतृत्वावर ज्या पद्धतीने टीका केली, ती मला आवडली नाही, असे ट्रम्प यांनी एका मुलाखतीत म्हटले.