नेपाळहून महाकुंभला निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात, 40 जण जखमी; सहा जणांची प्रकृती चिंताजनक

नेपाळहून प्रयागराज येथे महाकुंभला निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील 40 भाविक जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. काठमांडूपासून 500 किमी पश्चिमेला असलेल्या सुर्खेत जिल्ह्यातील भेरीगंगा नगरपालिकेच्या बाबाई परिसरात रविवारी सायंकाळी 5.30 वाजता हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाली प्रांतातील सुर्खेत येथून महाकुंभासाठी 40 भाविक प्रयागराजला चालले होते. यादरम्यान ही घटना घडली. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. जखमींना उपचारासाठी कोहलपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.