पाकिस्तानी सैन्यावर बलूच आर्मीचा हल्ला, स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवून ताफा उडवला; 90 सैनिक ठार

पाच दिवसांपूर्वीच पेशावर ते क्वेट्टादरम्यान धावणारी जाफर एक्स्प्रेस हायजॅक करून तब्बल 214 ओलिसांना ठार मारणाऱ्या बलूच लिबरेशन आर्मीने आज पाकिस्तानी सैन्यावर आत्मघाती हल्ला केला. स्फोटकांनी भरलेले वाहन सैन्याच्या ताफ्यात घुसवून स्फोट घडविण्यात आला. त्यात 90 सैनिकांना मारल्याचा दावा बीएलएने केला आहे. क्वेटाहून कफ्तानला जाणाऱ्या 8 लष्करी वाहनांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी बीएलएने घेतली आहे.