![philipins plane crash](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/philipins-plane-crash-696x447.jpg)
अमेरिकन लष्कराचे एक विमान मिशनदरम्यान फिलीपीन्समध्ये कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक अमेरिकन सेवा सदस्य आणि तीन संरक्षण कंत्राटदारांचा समावेश आहे. फिलीपिन्सच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने अपघाताची पुष्टी केली आहे. अपघात कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही.
अपघातग्रस्त विमान फिलीपिन्स सैन्याच्या विनंतीवरून गुप्तचर माहिती, पाळत ठेवणे आणि मदत पुरवत होते, असे यूएस इंडो-पॅसिफिक कमांडने एका निवेदनात म्हटले आहे. गुरुवारी नियमित मिशनवर असताना फिलीपीन्समधील अम्पातुआन शहरात विमान दुर्घटनाग्रस्त झाले. ढिगाऱ्याखालून चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.