अमेरिकेतील प्रवासी विमान आणि आर्मीच्या हेलिकॉप्टरची टक्कर होण्याच्या 30 सेकंद आधी कंट्रोलरने हेलिकॉप्टरमध्ये संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला होता. पण अवघ्या 30 सेकंदात विमान धडकले आणि तो संदेश टक्कर टाळण्यात अपयशी ठरला.
‘तुमच्या दृष्टीक्षेपात विमान आलेय का?’ अशी विचारणा कंट्रोलरने हेलिकॉप्टरमधील अमेरिकन सैनिकांना केली होती. त्यानंतर काही क्षणांत कंट्रोलरने आणखी एक रेडिओ कॉल केला. त्यात ‘पीएटी 25 सीआरजेच्या मागून पुढे गेले आहे, असे म्हटले आहे. मात्र त्यावेळी कुठल्याही उड्डाण ट्रॅकिंग साइटवरुन लष्कराच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरमधून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. नंतर अवघ्या काही क्षणांत प्रवासी विमान आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरमध्ये जोरदार धडक झाली.
बुधवारी संध्याकाळी पोटोमॅक नदीवरील हवाई क्षेत्रात हा अपघात झाला. विमानात एकूण 60 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते, तर आर्मीच्या ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरमध्ये तीन अमेरिकन सैन्य सैनिक होते. या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला तर चौघांना वाचवण्यात यश आले आहे. बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.