
चीनमध्ये युंचेंग सॉल्ट लेक म्हणजे पृथ्वीवरचा एक अद्भुत नजारा आहे. अत्यंत सुंदर मनमोहक रंगाची ही शृंखला आहे. या समद्रात मीठाचे प्रमाण जास्त असल्याने लोक त्यामध्ये पोहायला जात नाहीत. त्यामुळे त्याला मृत समुद्र असे म्हणतात.
युक्रेन विरुद्ध युद्धात रशियाने बाईक उतरवल्या
अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया – युक्रेन युद्धाने वेगळे वळण घेतलंय. युद्धात दोन्ही बाजूंनी ड्रोन आणि रॉकेट्सने हल्ले सुरू आहेत. मोटारसायकलवर बसलेल्या रशियाच्या सैनिकांनी जलदगतीने आवाज करत युक्रेनच्या मोर्चाला चारी बाजूने घेरले आणि गोळीबार सुरू केला. हे युद्ध आणखी भयंकर झाले आहे.
युक्रेनच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात युक्रेनच्या सैनिकांवर जितके हल्ले झाले आहेत, ते अधिकतर मोटारसायकलवरून आलेल्या सैनिकांनी केले आहेत. ते झिग झॅग करत एकदम सुसाट येतात आणि क्षणात निघून जातात. त्यामुळे त्यांच्यावर ड्रोन किंवा अन्य हल्ला करणे कठीण होते. परिणामी युक्रेनचे अनेक सैनिक मरण पावले. रशियाने लढाऊ वाहनांना वाचवत स्वस्त मोटार- सायकल लढाईत उतरवले आहेत.
नौदलप्रमुख दिनेश त्रिपाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर
नौदल प्रमुख एडमिरल दिनेश त्रिपाठी चार दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. त्यांचा पहिलाच विदेश दौरा आहे. नुकत्याच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आल्या होत्या.
कॅन्सरग्रस्त किंग चार्ल्स पुन्हा शाही सैन्य पोशाखात
कॅन्सरशी लढणाऱ्या किंग चार्ल्स यांचे छायाचित्र समोर आले आहे. त्यांचा एक फोटो नुकताच प्रसिद्ध झाला असून ते ब्रिटेनच्या शाही सैन्य पोशाखात दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
डॉ. संपत शिवांगी यूएसच्या रिपब्लिकन पार्टीचे प्रतिनिधी
हिंदुस्थानी वंशाचे डॉ. संपत शिवांगी यांची रिपब्लिकन पार्टीचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली आहे. जुलैमध्ये मिल्वौकीमध्ये होणाऱ्या रिपब्लिकन
नॅशनल कन्व्हेन्शनसाठी त्यांची निवड झाली आहे.
गुगल मॅपमुळे कार थेट नदीत
गुगल मॅपचा वापर करून रुग्णालयाकडे निघालेल्या दोन तरुणांची कार चक्क दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत गेली. पुरात वाहून जात असलेली त्यांची कार सुदैवाने एका झाडाला अडकली आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या दोघांना सुखरूप बाहेर काढले. केरळच्या उत्तरेकडील कासरगोड जिह्यात ही घटना घडली. ते दरवाजा उघडून कसेतरी बाहेर आले आणि त्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. मागील महिन्यातही अशीच घटना घडली होती.
मगरीने भरवली धडकी
रत्नागिरी जिह्यातील चिपळूणच्या चिंचनाका परिसरात भलीमोठी मगर नागरी वस्तीत शिरल्याने खळबळ उडाली. रविवारी रात्री महाकाय मगर रस्त्यावर दिसली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.