को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन आयोजित आंतर सहकारी बँक कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीत सिटी बँकेच्या शिशिर खडपेने, तर महिला एकेरीत अपना बँकेच्या गौरी कोरगावकरने अजिंक्यपद पटकावले. पुरुष दुहेरीत प्रथमेश पवार-अतुल काकिर्डे जोडीने आणि महिला दुहेरीत उषा कांबळे-संध्या बापेरकर जोडीने बाजी मारली.
दादर पश्चिमेला सीबीईयू सभागृहात पार पडलेल्या स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत पहिल्या सेटमध्ये 1-0 आघाडीसह वर्चस्व राखणाऱया गीतेश कोरगावकरला पुढील दोन सेटमध्ये अचूक फटकेबाज खेळ करीत शिशिर खडपेने 5-12, 25-0, 17-15 असे चकविले आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. महिली एकेरीत अपना बँकेच्या गौरी कोरगावकरने म्युनिसिपल बँकेच्या उषा कांबळेवर 10-15, 12-6, 22-7 अशी मात केली आणि जेतेपदाला गवसणी घातली. महिला दुहेरीचे अजिंक्यपद जिंकताना उषा कांबळे-संध्या बापेरकर जोडीने गौरी कोरगावकर-साक्षी सरफरे जोडीचा 10-12, 20-0, 19-11 असा पराभव केला.