
सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर रील हा प्रकार सर्वात जास्त पाहिला जाणारा प्रकार आहे. परंतु, अनेकदा कंटेट म्हणून लोक काहीही दाखवत असतात. कंटेट आवडल्यास त्याला लाईक करण्याचा पर्याय आहे. परंतु, न आवल्यास डिसलाईक करण्याचा ऑप्शन मिळत नाही. कोणत्या व्हिडीओला किती लाईक आणि डिसलाईक मिळाले हे समजत नाही.
इन्स्टाग्राम हे फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. येथे युजर्स त्यांचे नवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. या फोटो आणि व्हिडीओवर हजारो लोक कमेंट करतात. आतापर्यंत इन्स्टाग्रामवर युजर्सना केवळ कमेंट्स लाईक करण्याचा ऑप्शन दिला जात होता. म्हणजेच तुम्हाला कमेंट आवडली किंवा नाही तरीदेखील तुमच्याकडे केवळ ती कमेंट लाईक करण्याचाच ऑप्शन होता. मात्र आता तुम्ही तुम्हाला न आवडलेली कमेंट डिसलाईक करू शकता आणि कोणालाही त्याबद्दल माहितीही मिळणार नाही. कमेंट डिसलाईकचे नवीन फीचर इन्स्टाग्रामवर लवकरच रोल आऊट होणार आहे. यासाठी मेटा सध्या चाचपणी करत आहे. काही युजर्सनी इन्स्टाग्रामवरील कमेंट सेक्शनमध्ये डिसलाइक बजेटदेखील पाहिले आहे. यानंतर कंपनीनेही या फीचरला दुजोरा दिला आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण फीचर, पोस्ट आणि रील्स दोन्हीवर दिसेल. यानंतर युजर्सना कोणतीही कमेंट आवडली नाही किंवा ती रिल किंवा पोस्टसंबंधित वाटत नसल्यास युजर्स ती कमेंट डाऊनलोड किंवा डिसलाईक करू शकतील. कमेंट करणाऱ्या युजर्सनाही कळणार नाही की त्यांची कोणती कमेंट डिसलाईक झाली आहे. इन्स्टाग्रामचे हे फीचर लवकरच रोल आऊट केले जाणार आहे.
काऊंटिंग होणार नाही
इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच हे फीचर येऊ शकते. या फीचरमध्ये डिसलाईक काऊंटिंग होणार नाही. कुणीही युजर दुसऱ्याचा डिसलाईक पाहू शकत नाही. इन्स्टाग्राम युजर्सचा फोटो आणि व्हिडीओवर कमेंट अनुभव सुधारण्याच्या उद्देशाने हे फीचर सादर केले जात आहे. कमेंटवर मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे कंपनी कमेंट कोणत्या क्रमाने प्रदर्शित करावी हे ठरवू शकेल. उदाहरणार्थ, जर एखादी कमेंट खूप नापसंत केली गेली तर ती कमेंट सेक्शनच्या तळाशी दिसेल.