मनोज सोनी यांच्या राजीनाम्याची चौकशी करा

 वादग्रस्त पूजा खेडकर यांची नियुक्ती रद्द होण्याची प्रक्रिया सुरू असताना केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी अचानकपणे दिलेल्या राजीनाम्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाच वर्षं शिल्लक असताना सोनी यांनी अचानक राजीनामा का दिला? हा प्रश्न जनतेला पडला आहे. त्यामुळे सत्य बाहेर येण्यासाठी पूजा खेडकरप्रकरणी मनोज सोनी यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रचितगड या शासकीय निवासस्थानी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी सोनी यांच्यासह यूपीएससी, नीट घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली. सन 2023 मध्ये गुजरात-बडोदा येथील विद्यापीठात सगळ्यात तरुण कुलगुरू म्हणून सोनी यांची नियुक्ती केली होती. तेव्हाही त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला होता, असे वडेट्टीवार म्हणाले.