हुंड्यासाठी टोचले एचआयव्हीचे इंजेक्शन

 

उत्तर प्रदेशमध्ये हुंडा दिला नाही म्हणून सासरच्या लोकांनी महिलेला एचआयव्हीबाधीत इंजेक्शन टोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहानपूरमधील न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना एका 30 वर्षीय महिलेच्या सासरच्या लोकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. महिले आई-वडील त्यांची हुंडय़ाची मागणी पूर्ण न करू शकल्याने सासरच्यांनी तिला एचआयव्हीबाधित सुईचे इंजेक्शन दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.