
आयटी कंपनी इन्फोसिसने जवळपास 240 प्रशिक्षणार्थींना कामावरून काढून टाकले आहे. हे प्रशिक्षणार्थी मूल्यांकन चाचणी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने कंपनीने त्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रशिक्षणार्थी गेल्यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कंपनीत सहभागी झाले होते. कंपनीत कायमस्वरूपी नोकरी मिळेल असे प्रशिक्षणार्थी यांना वाटत होते, परंतु कंपनीने त्यांना नारळ देऊन त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. 18 एप्रिलला कंपनीने एक ई-मेल पाठवून कर्मचाऱयांना यासंबंधी कळवले आहे.