आठवड्यात 70 तास काम कराच असे कोणी म्हणू शकत नाही

इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी 70 तास काम करण्याबाबतच्या त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण देताना हे चुकीचे नसले तरी असे करणे कोणावरही लादू शकत नाही, असे स्पष्ट केले. गतवर्षी त्यांनी हिंदुस्थानातील तरुणांनी आठवडय़ातून 70 तास काम करायला हवे असे विधान केले होते. यावरून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले गेले होते.