
एक इन्फ्लुएन्सर एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये फुकटचा नाश्ता करायला गेली होती. पण हॉटेलच्या स्टाफने तिला पकडलं आणि तिचं बिंग फुटलं. या नाश्त्यासाठी तिला साडे तीन हजार रुपये मोजावे लागले. माझ्या आयुष्यात एका नाश्त्यासाठी एवढे पैसे मोजले नव्हते अशी प्रतिक्रिया तिने दिली. दुसरीकडे कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी तिला चांगलेच सुनावले होते.
निशू तिवारी हिचे इन्स्टाग्रामवर inishutiwari नावाने अकाँऊट आहे. तिचे दहा लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत. निशू एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोहोचली. निशूने नाईट ड्रेस घातला आणि आपण या हॉटेलमधलेच गेस्ट आहोत असं भासवलं. रिसेप्शनला विचारून ती ब्रेकफास्टच्या ठिकाणी गेली. तिथे तिला रूम नंबर विचारला तेव्हा तिने 3206 हा रुम नंबर सांगितला. तेव्हा हॉटेल स्टाफने तिला आत जायला सांगितले. निशूने हॉटेलमध्ये नाश्ता घेतला आणि खाल्ला सुद्धा. तिथून ती निघाली सुद्धा. पण हॉटेल स्टाफने तिला अडवलं आणि पुन्हा रुम नंबर विचारला. तेव्हा तिन्हे पुन्हा नंबर सांगितला. पण या रुमचे गेस्ट ब्रेकफास्टसाठी आले होते आणि निशूचे बिंग फुटले. तेव्हा निशूने बिल मागवलं. हॉटेल स्टाफने तिला तीन हजार सहाशे रुपयांचं बिल दिलं. निशून हे बिल चुकवलं आणि निघाली. एवढा महाग नाश्ता आपण कधीच केला नाही असे निशूने म्हटलं.
View this post on Instagram
दुसरीकडे कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी निशूला सुनावलं. स्टाफमुळे निशूची चोरी पकडली गेली, अशी आयडिया देणे चुकीचे असल्याचे एकाने म्हटले. तसेच लोकांकडे पैसा आला तरी काही लोकांकडे क्लास येत नाही असे म्हटले.