इंफिनिक्सचा नोट 40X 5G स्मार्टफोन लाँच; जाणून घेऊया फोनची वैशिष्ट्ये

मोबाईल कंपन्यांमध्ये नव्याने पदार्पण केलेल्या असलेल्या इंफिनिक्सने नोट 40X 5G फोन लाँच करत असल्याची घोषणा केली. हे डिव्हाईस इंफिनिक्सच्या आतापर्यंतच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असून मध्यम-श्रेणीच्या स्मार्टफोन सेगमेंटमध्ये उत्तम पर्याय आहे. हा फोन अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नोट सिरिजपैकी एक आहे. नवीन नोट 40X 5G हा बँक ऑफर्ससह रूपये 13,499च्या सुरुवातीच्या किमतीमध्ये 9 ऑगस्टपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार असून, तो फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोअर्सवरदेखील बँक ऑफर्सवर खरेदी करता येणार आहे.

नोट 40X 5G त्याच्या क्लासमध्ये एक नवीन बेंचमार्क निश्चित करत 8GB+256GB आणि 12GB+256GB असे दोन अभूतपूर्व मेमरी कॉन्फिगरेशन्स आहेत. हे दोन्ही कॉन्फिगरेशन्स UFS 2.2 स्टोरेज टेक्नॉलॉजी वापरतात. या संयोजनामुळे ॲपचे अतिशय वेगाने लॉंच होणे, सीमलेस मल्टीटास्किंग आणि सर्व युझर कंटेटसाठी पुरेशी स्पेस सुनिश्चित करते. हा डिव्हाईस मीडियाटेक डायमेंसिटी 6300 प्रोसेसरद्वारे संचालित आहे, जो दैनंदिन कामांपासून ते रिसोर्स-इंटेंसिव्ह ऍप्लिकेशन्स आणि मोबाईल गेमिंगपर्यंत अशा सर्व गोष्टींसाठी उत्तम परफॉर्मन्स प्रदान करतो.

नोट 40X 5Gच्या प्रगत कॅमेरा सिस्टममुळे फोटोग्राफी प्रेमींना आनंद होईल. या डिव्हाईसमध्ये 108MP ट्रिपल एआय कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, जो क्वाड-एलईडी फ्लॅशच्या मदतीने लाईटच्या आव्हानात्मक परिस्थितींतही फोटोजची आकर्षक गुणवत्ता सुनिश्चित करतो. वापरकर्ते 15पेक्षा जास्त कॅमेरा मोड्सच्या साहाय्याने त्यांची सर्जनशीलता एक्सप्लोर करू शकतात. कॅमेरा मोड्समध्ये इंटेलिजेंट सीन ऑप्टिमायझेशनसाठी AI कॅम, प्रोफेशनल-दिसणाऱ्या डेप्थ इफेक्ट्ससाठी पोर्ट्रेट मोड, एकाच वेळी समोर आणि मागील कॅमेरा रेकॉर्डिंगसाठी ड्युअल व्हिडिओ मोड, मॅन्युअल कंट्रोलसाठी प्रो मोड आणि सिनेमॅटीक व्हिडिओ कॅप्चरसाठी फिल्म मोड यांचा समावेश आहे. या डिव्हाईसमधील समर्पित एलईडी फ्लॅशयुक्त सुधारित 8MP फ्रंट कॅमेरा कोणत्याही वातावरणात उच्च-गुणवत्तेच्या सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्सची हमी देतो.

नोट 40X 5G मध्ये 120Hz रीफ्रेश रेटसह 6.78″ FHD+ डिस्प्ले उपलब्ध आहे, जो स्मूथ स्क्रोलिंग आणि रिस्पॉन्सिव्ह टच इंटरॲक्शन प्रदान करतो. याची पंच-होल डिझाइन स्क्रीन रिअल इस्टेटला जास्तीत जास्त वाढवते, तर याचे नाविन्यपूर्ण इंटरएक्टिव्ह डायनॅमिक पोर्ट नोटीफिकेशन्स आणि संवादाला अधिक अद्वितीय बनवतात. व्हिज्युअल अनुभवाला पूरक म्हणून या स्मार्टफोनमधील डीटीएस साउंड टेक्नॉलॉजीयुक्त ड्युअल स्पीकर सिस्टम समृद्ध आणि सखोल ऑडिओ अनुभव प्रदान करते देते, ज्यामुळे नोट 40x गेमिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि म्युझिक प्लेबॅकसाठी मनोरंजनाचा पॉवरहाऊस ठरतो.

पाम ब्लू, स्टारलिट ब्लॅक आणि लाइम ग्रीन अशा तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या नोट 40X 5Gमध्ये एक प्रीमियम ग्रेडियंट बॅक डिझाइन उपलब्ध आहे, जी डोळ्यांना सुखावते आणि हातळण्यास छान वाटते. हा डिव्हाईस 5000mAhच्या भक्कम बॅटरीद्वारे समर्थित आहे, ज्यामुळे संपूर्ण दिवसभर त्याचा वापर सुनिश्चित होतो. 18W जलद चार्जिंग सपोर्टसह वापरकर्ते त्यांचा डिव्हाईस त्वरीत चार्ज करू शकतात आणि सर्वात महत्त्वाच्या असलेल्या कामांना पूर्ण करु शकतात. यातील एआय चार्ज फीचर बॅटरीचे आरोग्य चांगले राखून चार्जिंग प्रक्रियेला अनुकूल बनवतो आणि कालांतराने दीर्घ व चांगले परफॉर्मन्स सुनिश्चित करतो.

पाम ब्लू, लाइम ग्रीन आणि स्टारलिट ब्लॅक अशा तीन आकर्षक ग्रेडियंट रंगांमधील प्रिमियम डिझाईन उपलब्ध असलेला इन्फिनिक्स नोट 40X 5G स्मार्टफोन दोन मेमरी व्हेरिएन्ट मध्ये उपलब्ध आहे- 12GB + 256 GB ज्याची किंमत 14,999 रुपये आहे अधिक 1000 रुपये कॅशबॅक आणि रुपये 13,499 वरती रुपये 500 कॅशबॅक. दोन्ही फोन निवडक बॅंकांतर्फे उपलब्ध आहेत. ग्राहकांना एक अपवादात्मक अष्टपैलू मनोरंजन क्षमतांसाठी सर्वोत्तम व्हॅल्यू प्रपोझिशन देत आहेत. बँक ईएमआय, बजाज फायनान्स, टीव्हीएस फायनान्स, होम क्रेडिट आणि पाइन लॅब यांद्वारे सोपे ईएमआय ऑप्शन्सही उपलब्ध आहेत. नवीन इनफिनिक्स नोट 40 एक्स 5 जी फ्लिपकार्ट आणि आपल्या जवळच्या रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध असेल.