Pahalgam Attack नंतर सीमेवर पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न, जवानांनी डाव उधळला, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

jawan

जम्मू आणि कश्मीरच्या (Jammu and Kashmir) बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LOC) घुसखोरीचा प्रयत्न झाला. देशाच्या सुरक्षा दलांनी घुसखोरांचा हा प्रयत्न रोखला. तर यासोबतच किमान दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती लष्कराने बुधवारी दिली.

’23 एप्रिल 2025 रोजी, बारामुल्ला (उत्तर कश्मीरमधील) उरी नाला येथील सरजीवन या क्षेत्रातून सुमारे 2-3 दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला’, असे चिनार कॉर्प्सने सकाळी 8 वाजता पोस्ट केले.

‘सतर्क सैन्याने घुसखोरांना प्रत्त्युत्तर दिले आणि त्यांना घुसखोरांना रोखले’, असे त्यात म्हटले आहे.

दोन दहशतवाद्यांना कंठस्नान!

Chinar Corps - Indian Army

 

 

 

 

 

 

 

 

 

 

‘दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि युद्धात वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे’, असे चिनार कॉर्प्सने म्हटले आहे. तसेच ऑपरेशन सुरू आहे, असेही त्यात म्हटले आहे.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात 26 जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले, त्यानंतर काही तासांतच ही चकमक सुरू झाली. हा जम्मू आणि कश्मीरमधील अलीकडच्या काळातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यात नौदलाचा एक अधिकारी आणि गुप्तचर विभागाचा एक अधिकारीही जखमी झाला.

हल्ल्यात जखमी झालेल्यांना बाहेर काढण्यासाठी लष्करी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली होती, कारण या भागात फक्त पायी किंवा घोड्यावरून जाता येते.