भाजपमुळे हिंजवडीतून उद्योग बाहेर गेले, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणले आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.
शरद पवार म्हणाले की, ”पिंपरी-चिंचवड शहरात आणि परिसरालगत उद्योग वाढविले, आयटीपार्क आणून हजारो लोकांना काम दिलं. मात्र आता शहराचा चेहरा दिवसेंदिवस खराब होत असून पाणी, वीज, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांबाबत गेल्या काही वर्षात हवे तसे काम झाले नाही. भाजप उद्योगांना हव्या त्या सुविधा देऊ शकले नाही. म्हणून 30 ते 35 कंपन्या हिंजवडीतून बाहेर गेल्या.”
शरद पवार म्हणाले आहेत की, ”देशात आधी महाराष्ट्र पहिल्या क्रमाकांचे राज्य होते. काही ठराविक लोकांच्या हातामध्ये सत्ता गेल्यानंतर मागील दहा वर्ष महाराष्ट्राचे चित्र चांगलं नाही. काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील विकास पाहण्यासाठी बाहेरून लोक येथे येत होते. मात्र आता तसं चित्र राहिलेलं नाही.”
ते म्हणाले, ”पायाभूत सुविधाबाबत गेल्या काही वर्षात हवे तसे काम झाले नाही. यामुळे हिंजवडीतून 30 ते 35 कंपन्या बाहेर गेल्या. हजारो लोकांचा रोजगारही गेला. यात दुरुस्ती करणं गरजेचं आहे.”