विमानात महिलांना आवडती सीट निवडता येणार   

इंडिगो एअरलाईन्सने महिला प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे विमान प्रवासात महिलेला महिलेच्या बाजूची सीट निवडता येईल. वेब चेक इन करणाऱया महिलांना या सुविधेचा लाभ घेता येईल. बऱयाचदा विमानाने एकटय़ाने प्रवास करणाऱया महिलांना अडचणींचा सामना करावा लागतो. पुरुष सहप्रवाशाकडून त्रास होतो. विनयभंगासारखे प्रकार घडतात. महिलांच्या सुरक्षित आणि आरामदायी विमान प्रवासासाठी आता इंडिगो एअरलाईन्सने पाऊल उचलले आहे. महिलेला महिलेच्या बाजूची सीट निवडता येणार आहे. पीएनआर स्वरूपात ही सुविधा असेल. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यावर बरेच संशोधन करण्यात आलेले आहे.

विमानात महिलांसोबत पुरुष प्रवाशांनी गैरवर्तन केल्याच्या घटना घडल्या होत्या. जुलै 2023 मध्ये दिल्ली-मुंबई इंडिगो विमानात प्राध्यापकाने महिलेचा विनयभंग केला होता. सप्टेंबर 2023 मध्येही मुंबई-गुवाहाटी विमानात महिलेला असाच त्रास झाला होता.

वेब चेक इन सुविधेमुळे कॉम्प्युटर आणि स्मार्टपह्नवरूनही चेक इन प्रक्रिया पूर्ण करता येते. त्यासाठी एअरपोर्ट चेक इन काऊंटरवर जाण्याची गरज नाही.