
पक्ष्याची धडक बसल्याने बंगळुरूला जाणारे इंडिगो विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. सोमवारी सकाळी केरळमधील तिरुअनंतपुरम येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेण्यापूर्वी विमानाला पक्षी धडकल्याचे विमानतळ सूत्रांनी सांगितले. विमानात 179 प्रवासी होते.
विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोचे 6ई 6629 हे विमान तिरुअनंतपुरमहून बेंगळुरूसाठी रवाना होणार होते. मात्र उड्डाण घेण्यापूर्वीच विमानाला पक्षी धडकल्याने ते रद्द करण्यात आले. विमानाची देखभाल-दुरुस्ती सुरू आहे. विमानातील सर्व प्रवाशांना सायंकाळी 6.30 वाजता दुसऱ्या विमानाने बंगळुरुला रवाना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.