नदऱयाखोऱयांमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हिंदुस्थानच्या लष्कराच्या ताफ्यात आता ‘जोरावर’ हा स्वदेशी रणगाडा दाखल होणार आहे. गुजरातच्या हजीरा येथे डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे प्रमुख डॉ. समीर व्ही कामत यांनी स्वदेशी जोरावर टँक प्रकल्पाचा आढावा घेतला. हा रणगाडा पूर्व लडाख सेक्टरमध्ये हिंदुस्थानी लष्कराचे सामर्थ्य वाढवण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. चीनकडून एलएसीवर तैनात सैन्यदलाचा मुकाबला करण्यासाठी जोरावरची खास निर्मिती करण्यात आली आहे. लार्सन अॅण्ड टुब्रो आणि डीआरडीओने संयुक्तरीत्या ‘जोरावर’ची निर्मिती केली आहे.
‘जोरावर’च्या निर्मितीसाठी 17,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. असे हलक्या वजनाचे तब्बल 354 रणगाडे तयार करण्यात येणार आहेत.
25 टनांहून कमी वजन असलेल्या ‘जोरावर’ या रणगाडय़ाची क्षमता प्रचंड आहे.