दीपिका पदुकोणच्या डिप्रेशनची खिल्ली उडवली;  कॉमेडियन होतेय ट्रोल

कॉमेडीयन समय रैनाचा टॅलेंट शो इंडियाज गॉट लेटेंट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. स्डॅंडअप कॉमेडि शोमध्ये अनेक सेलिब्रिटी, बिझनेसमॅन यांच्यावर भाष्य केले जाते. यावर त्यांचे चाहते देखील आनंद घेताना दिसतात. अशातच समय रैनाच्या टॅलेंट शोच्या एका एपिसोडमध्ये एका स्पर्धकाने दीपिका पदुकोणच्या डिप्रेशनची खिल्ली उडवली. यावेळी मात्र चाहत्यांनी बंटी बॅनर्जीला चांगलेच फैलावर घेतले आहे. त्यामुळे दीपिका पदुकोणच्या मानसिकतेची खिल्ली उडवणे बंटी बॅनर्जीला चांगलेच अंगलट आले आहे.

व्हायरल होत असलेल्या कॉमेडियनच्या व्हिडिओमध्ये त्या महिला स्पर्धकाने दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगची मुलगी दुआ यांच्या जन्माबद्दल भाष्य केले आहे. ‘दीपिका पदुकोणही नुकतीच आई झाली आहे. छान, आता त्यांना माहित आहे की नैराश्य खरोखर कसे वाटते. कॉमेडियनच्या या कमेंटवर शोचे जज समय रैना, तन्मय भट्ट, रघु राम, न्यूरोलॉजिस्ट डॉ. सिड वॉरियर आणि बलराज सिंह घई खूप हसताना दिसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दीपिका पदुकोणच्या डिप्रेशनची खिल्ली उडवल्यामुळे कॉमेडियन सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे . एका यूजरने लिहिले- ‘या फ्रेममध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःची लाज वाटली पाहिजे. नैराश्याची अशी कोणतीही श्रेणी नाही. अशा शोमुळे मूर्खपणा वाढत आहे जिथे लोक प्रत्यक्षात सहभागी होतात. लज्जास्पद आहे की प्रत्येकाला हे आनंददायक वाटले. असे त्या यूजरने लिहिले आहे. दुसऱ्या व्यक्तीने कमेंट केली की – ‘हे खूप वाईट आहे. नैराश्यामुळे लोक मरतात. एखाद्याने खोटी कथा रचली आहे असे आपल्याला वाटते म्हणून एखाद्यावर हसणे म्हणजे ती व्यक्ती किती असंवेदनशील आणि अशिक्षित आहे हे दिसून येते. अशा अनेक तीव्र प्रतिक्तिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.