हिंदुस्थानात मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये अनेक कार लॉन्च होणार आहेत. यातच पुण्यातील स्टार्टअप कंपनी वायवे मोबिलिटी आपल्या सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक कार ईव्हीएची अपग्रेडेड व्हेरीएंट याच सादर करणार आहे. ही कार सर्वाताधी ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर करण्यात आली होती. ही देशातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…
कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन सोलर इलेक्ट्रिक कारची डिझाइन मेट्रो शहरांना लक्षात घेऊन करण्यात आली आहे. कमी जागेतही ही कार सहज बसते. अवजड वाहतुकीत गाडी चालवणे सोपे होईल.
पूर्ण चार्ज झाल्यावर किती देते रेंज?
या नवीन सोलर कारबाबत कंपनीचा दावा केला आहे की, ही कार पूर्ण चार्ज झाल्यावर 250 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. तर कारच्या छतावर बसवण्यात आलेल्या सोलर पॅनलच्या मदतीने ही कार 3 हजारांपर्यंत धावू शकते. ही कार अल्ट्रा फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करते. ही कार फक्त 5 मिनिटांच्या चार्जमध्ये 50 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते, असं कंपनीचं म्हणणं आहे.
किंमत किती?
या कारची किंमत सुमारे 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते. मात्र याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.