कन्याकुमारी येथे देशातील पहिला काचेचा पूल बांधण्यात आला आहे. 77 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद असा हा पूल आहे. काचेच्या पुलाखाली समुद्र आहे. पुलावरून चालताना आपण समुद्रावरून चालत आहोत, असे वाटते. काचेच्या पुलाचे उद्घाटन तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या हस्ते सोमवारी झाले. काचेच्या पुलावरून पर्यटकांना कन्याकुमारी काठावरील विवेकानंद रॉक मेमोरिअल येथून थेट 133 फूट उंच तिरुवल्लुवर पुतळ्यापर्यंत पोहोचता येणार आहे. पुलाच्या उद्घाटनानंतर तिरुवल्लुवरील पुतळ्यावर लेझर शो सादर झाला. पुलासाठी उच्च दर्जाच्या काचा बसवण्यात आल्या असून जोरदार समुद्री वाऱ्यातही तग धरू शकेल़े