
हिंदुस्थानी युद्धनौका आयएनएस तेगने ओमानच्या समुद्रात बुडालेल्या 13 हिंदुस्थानी नागरिकांची सुटका केली आहे. ओमानच्या सागरी भागात प्रेस्टीज फाल्कन हा तेलाचा टँकर बुडाल्याची घटना घडली होती. जहाजावरील सुमारे 16 क्रू मेंबर्स बेपत्ता झाले होते, त्यापैकी 13 हिंदुस्थानी आणि 3 श्रीलंकेचे होते. नौदलाच्या मिशनवर तैनात असलेल्या आयएनएस तेग या युद्धनौकेने या टँकरला मदत करताना एपूण 9 क्रू मेंबर्सना वाचवले आहे. यामध्ये 8 हिंदुस्थानी आणि 1 श्रीलंकेच्या जवानाचा समावेश आहे.