केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आपला अर्थसंकल्प उद्या 1 फेब्रुवारी रोजी संसदेत मांडणार आहेत, परंतु बजेटआधीच शेअर बाजाराला ‘अच्छे दिन’ आल्याचे शुक्रवारी दिसले. हिंदुस्थानी शेअर बाजारात आज बऱयाच दिवसांनंतर उत्साह पाहायला मिळाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 740 अंकांनी वधारून 77,500 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 258 अंकांनी वाढून 23,508 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांच्या कमाईत चांगली वाढ झाली. बीएसईमधील कंपन्यांचे मार्पेट कॅप 5.47 लाख कोटींनी वाढून 423.34 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. शेअर बाजारात उत्साह येण्यामागे बजेटपूर्व आशावाद, आरबीआयकडून व्याजदरात कपातीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उद्या सादर होणाऱ्या बजेटकडून गुंतवणूकदारांना फार अपेक्षा आहेत. बजेटमध्ये कोणाला काय मिळतेय, केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून कोणत्या घोषणा केल्या जातात यावर बरेच काही अवलंबून आहे.
फायदा आणि तोटा
शेअर बाजारात आज काही शेअर्स फायद्यात राहिले तर काही शेअर्सना फटका बसला. फायद्यात राहणाऱया शेअर्समध्ये एलअँडटी, टायटन, मारुती कल्याण ज्वेलर्स इंडिया, कमर्शियल इंजिनीअरिंग, इलकॉन इंटरनॅशनल, आरव्हीएनएल, सेंच्युरी टेक्सटाईल्स या कंपन्यांचे शेअर्स होते, तर व्हर्लपूल इंडिया, वेदांत फॅशन, जेएसपीएल, बँक ऑफ बडोदा आणि आर्चियन केमिकल या कंपन्यांचे शेअर्स तोटय़ात राहिले.
किंडरची मोहीम
किंडर क्रीमीने स्टार मातांसोबत समीरा रेड्डी आणि मीरा राजपूत कपूर यांच्या सहभागाने ‘यम्मी अप्रूव्हड् बाय मम्मी’ मोहिमेची सुरुवात केली. या वेळी अमेडेओ अरागोना, प्रादेशिक विपणन प्रमुख, किंडर, फेरेरो इंडिया उपस्थित होते.
नवे सीईओ
प्रीमियम प्रवास कंपनी जॉय एन क्रू कंपनीने संग्राम घोरपडे यांची जॉय एन क्रूचे सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच अभिनव चंद्र हे कंपनीमध्ये चीफ सर्व्हिस डिलिव्हरी ऑफिसर म्हणून रुजू होणार आहेत. प्रज्ञा आदिराज यांनी या नियुक्त्यांबद्दल सांगितले.
पीएनजी ज्वेलर्सचे 50वे दालन सुरू
पीएनजी ज्वेलर्स यांनी ऐतिहासिक सातारा शहरात आपल्या नव्या दालनाचे उद्घाटन करून प्रादेशिक ज्वेलरी बाजारात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या नव्या दालनामुळे पीएनजी ज्वेलर्सची एकूण 50 दालनांची संख्या पूर्ण झाली असून हा ब्रँड आता जागतिक पातळीवर एका नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या हस्ते सातारा येथील दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
वस्त्रोद्योगासाठी आयटीएमईचे प्रदर्शन
भारतीय आंतरराष्ट्रीय वस्त्र यंत्रणा प्रदर्शन सोसायटीचे (इंडिया आयटीएमई सोसायटी) पुन्हा एकदा जागतिक वस्त्र तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी प्रदर्शन (जीटीटीईएस 2025) मुंबईतील गोरेगाव (पूर्व) येथे 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. 175 प्रदर्शकांना एकत्र आणून भारतीय वस्त्राsद्योग परिसंस्थेला उन्नत करण्यासाठी सज्ज आहे. विणकामात 42 आणि प्रक्रिया क्षेत्रात 38 प्रदर्शक सहभागी आहेत.
ऑटोकार इंडियाचा नवा विक्रम
ऑटोकार इंडिया आणि अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्हने भारतात तयार झालेल्या इलेक्ट्रिक मोटरसायकलने सर्वाधिक वेगाने धावण्याचा विक्रम केला आहे. या वेळी ऑटोकार इंडियाचे होर्माझद सोराबजी आणि अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्हचे सह-संस्थापक नीरज राजमोहन उपस्थित होते. अल्ट्राव्हायोलेट एफ99 या क्रांतिकारी भारतीय मोटरसायकलने तब्बल 258 किमी प्रतितास वेग गाठून हा विक्रम केला आहे.
पुष्पमचा व्हिला प्रोजेक्ट
पुष्पम इन्फ्राने ‘पुष्पम संस्कृती’ या प्रकल्पाच्या फेजचा ‘21 एन्क्लेव्ह’ हा व्हिला प्रोजेक्ट कर्जतला लॉन्च केला. या वेळी पुष्पम ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सचिन चोपडा उपस्थित होते. या प्रोजेक्टमध्ये 3 बीएचकेची 10 युनिट्स, 2 बीएचकेची 11 युनिट्स आहेत.
एन्कोर-अल्कॉम
एन्कोर-अल्कॉमने सर्वात मोठा अॅल्युमिनियम दरवाजांचा कारखाना गुजरातमधील सुरत येथे उभारला. कंपनी या प्लॅंटमध्ये अनेक टप्प्यांत 60 कोटी रुपये गुंतवत आहे. या वेळी एन्कोर वुडक्राफ्ट्सचे संस्थापक आणि एमडी अवथू शिवा कोटी रेड्डी उपस्थित होते.
महाराजाची नवी अगरबत्ती बाजारात
महाराजा अगरबत्ती कंपनीने आपली नवी अगरबत्ती मिस्टिक मस्क आणि प्रार्थना प्युअर ब्रँडची अगरबत्ती बाजारात आणली आहे. ही अगरबत्ती नैसर्गिक वनस्पतीपासून तयार करण्यात आली आहे. या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या अगरबत्त्या विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. कंपनीचा लोगो पाहूनच अगरबत्ती खरेदी करावी. दैनंदिन जीवनात पवित्र कार्यासाठी वापरण्यात येणाऱया अगरबत्ती नैसर्गिक वनस्पतीपासून तयार करण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क – 8669185071
आरईएसआरएल आणि एसीएल यांच्यात संयुक्त भागीदारी
रिसस्टेनिबिलिटी अॅण्ड रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेड (आरईएसआरएल) लिमिटेड आणि आरती सर्क्युलॅरिटी लिमिटेड यांच्यात प्लॅस्टिक रिसायकलिंग क्षेत्रात क्रांती आणण्यासाठी महत्त्वपूर्ण संयुक्त भागीदारी करण्यात आली. या वेळी रिसस्टेनिबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मसूद मलीक आणि आरती सर्क्युलेटरी लिमिटेडचे संचालक मिरिक गोगरी उपस्थित होते.