
हिंदुस्थानी शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 187 अंकांनी वधारून 79,595 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 41 अंकांनी वाढून 24,167 अंकांवर स्थिरावला. बीएसई सेन्सेक्सच्या 30 पैकी 15 शेअर्समध्ये आज वाढ पाहायला मिळाली. आयटीसीच्या शेअर्समध्ये सर्वात जास्त वाढ झाली. त्यानंतर हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, इटर्नलच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली, तर दुसरीकडे 15 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. घसरण झालेल्यांमध्ये इंडसइंड बँक, पॉवर ग्रीड, इन्फोसिस, भारती एअरटेल, बजाज फिनसर्वच्या शेअर्समध्ये घसरण झाली. मिडकॅपच्या शेअर्समध्ये दिवसभर चढ-उतार पाहायला मिळाला. हिंदुस्थानी शेअर बाजार कधारला जात असताना अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण मात्र सुरूच आहे. मंगळकारी रुपया 8 पैशांनी घसरून 85.23 प्रति डॉलरकर बंद झाला.
गुंतवणूकदारांनी कमावले 1.39 लाख कोटी
बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन मंगळवारी 427.24 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. सोमवारी हे 425.85 लाख कोटी रुपयांवर होते. यायाच अर्थ बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज जवळपास 1.39 लाख कोटी रुपयांनी वाढले. म्हणजेच गुंतवणूकदारांनी अवघ्या एका दिवसात 1.39 लाख कोटी रुपये कमावले.