नेपाळमध्ये हिंदुस्थानी सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरवर सामूहिक बलात्कार झाला आहे. या प्रकरणी चार हिंदुस्थानी नागरिकांसह दोन नेपाळी तरुणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हिंदुस्थानाची एक सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर नेपाळ फिरायला गेली होती. तिच्यासोबत चार हिंदुस्थानी तरुणही होते. ही तरुणी भैरहवा मधील क्लब आणि कसिनोमध्ये फिरल्यानंतर हॉटेलमध्ये आली. तेव्हा या चारजणांसह हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोन नेपाळी तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही तरुणी जेव्हा या नराधमांना विरोध करत होती तेव्हा या आरोपींनी तिला जबर मारहाण केली.
तरुणीने यावेळी आरडाओरड केली तेव्हा हॉटेलच्या मॅनेजरने तरुणीच्या खोलीकडे धाव घेतली आणि पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सहा जणांना अटक केली.