ट्रम्प यांच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतल्यापासून शेअर बाजार कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. आज सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टीची घसरण कायम राहिली. दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स 1,200 अंकांनी घसरून 76,084 पर्यंत खाली आला, तर निफ्टी 50 निर्देशांक 23 हजारांपर्यंत घसरला. या पडझडीत गुंतवणूकदारांचे जवळपास 10 लाख कोटी बुडाले.