![train](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/train-696x447.jpg)
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोकणातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रोत्सवासाठी कोकण आणि मध्य रेल्वेने जादा रेल्वेगाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 22 फेब्रुवारीला हा जत्रोत्सव होत आहे. त्यासाठी 21 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी स्थानकादरम्यान चार स्पेशल रेल्वेगाडय़ा धावणार आहेत. या गाडय़ांचे आरक्षण रविवारपासून खुले होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ट्रेन क्र. 01129 लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड स्पेशल शुक्रवार, 21 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 वाजून 55 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल. त्याच दिवशी दुपारी 12 वाजता ती गाडी सावंतवाडी रोड स्थानकात पोचेल, तर ट्रेन क्र. 01130 सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता सावंतवाडी रोड स्थानकातून मुंबईसाठी रवाना होईल. ही गाडी दुसऱया दिवशी सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहचेल. तसेच ट्रेन क्र. 01131 लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड स्पेशल शनिवार, 22 फेब्रुवारीला मध्यरात्री 12 वाजून 55 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12 वाजता सावंतवाडी रोड स्थानकावर पोचेल. ट्रेन क्र. 01132 सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल 22 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता सावंतवाडी रोड स्थानकातून सुटेल. ही गाडी दुसऱया दिवशी सकाळी लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहचेल.
n जादा गाडय़ांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी या स्थानकांवर थांबा असेल.
जत्रेनंतर दोन दिवस धावणार स्पेशल गाडय़ा
22 फेब्रुवारीला जत्रा झाल्यानंतर पुढील दोन दिवस स्पेशल ट्रेन धावणार आहेत. ट्रेन क्र. 01134 सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक स्पेशल रविवार, 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता सावंतवाडी रोड स्थानकातून सुटेल. ही गाडी दुसऱया दिवशी सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोचेल. तसेच ट्रेन क्र. 01133 लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड स्पेशल सोमवार, 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटेल. ही गाडी त्याच दिवशी 7 वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोचेल.