
अमेरिकेतील डोमिनिकन रिपब्लिक येथील समुद्रकिनारी मित्र मैत्रीणीसोबत फिरायला गेलेली हिंदुस्थानी वंशांची एक तरुणी अचानक बेपत्ती झाली आहे. सुदिक्षा कोनकानकी असे त्या तरुणीचे नाव असून ती 20 वर्षांची आहे.
सुदिक्षा ही पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीत दुसऱ्या वर्षाची विद्यार्थीनी आहे. ती तिच्या कॉलेजच्या काही मित्र मैत्रीणींसोबत पुंटा काना रिसॉर्टला फिरायला गेली होती. ती मित्र मैत्रिणींसोबत बिचवर फिरायला गेली असताना अचानक ती बेपत्ता झाली. तिच्या मित्र मैत्रिणींनी तिला खूप शोधलं पण ती सापडली नाही. त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. शनिवारी संपूर्ण दिवस पोलिसांनी तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही.
सुदिक्षा ही पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीत दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. याआधी ती थॉमस जेफरसन सायन्स टेक्नॉ़लॉजी या कॉलेजमध्ये होती.