
अनेकजण व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. मात्र, व्यसनामुळे एका माथेफिरूने बाप-लेकीवर गोळीबार केल्याची घटना अमेरिकेत घडली आहे. या गोळीबारत त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. व्हर्जिनियामधील एका डिपार्टमेंटल स्टोअरबाहेर गुजराती बाप-लेकीच्या हत्येने अमेरिकेतील हिंजुस्थानी समुदायाला धक्का बसला आहे. एका आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तीला दारू हवी होती आणि दुकान बंद होते म्हणून त्याने हा गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे.
21 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता प्रदीपभाई पटेल (56) मुलगी उर्मीसोबत डिपार्टमेंट स्टोअर उघडत असताना त्या व्यक्तीने दोघांवरही गोळ्या झाडल्या. यात प्रदीपभाई पटेल यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या 26 वर्षीय मुलीचा रुग्णालयात मृत्यू झाला. आरोपीची ओळख जॉर्ज फ्रेझियर डेव्हॉन व्हार्टन म्हणून झाली आहे. तो रात्रभर दारू खरेदी करण्यासाठी त्यांच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये फिरत होता. त्यामुळे त्याचा राग अनावर झाला होता.
प्रदीप आणि उर्मी तिथे पोहोचल्यावर त्याने त्यांना विचारले की दुकान का बंद आहे? रात्रभर वाट पाहण्यास लावल्याबद्दल आरोपीने दोघांवरही राग व्यक्त केला. रागाच्या भरात जॉर्जने दोघांवर गोळीबार केला. त्यात प्रदीप यांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्मीला रुग्णालयात दाखल केल्यावर तिचा मृत्यू झाला.घटनेनंतर दोन तासांतच अमेरिकन पोलिसांनी आरोपीला अटक केली. तो माथेफिरू असल्याची माहिती मिळाली आहे.
जॉर्जवर खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीरपणे बंदूक बाळगणे आणि गुन्ह्यात प्राणघातक शस्त्राचा वापर केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. सध्या त्याला अकोमॅक तुरुंगात ठेवण्यात आले आहे. पोली. या घटनेचा तपास करत आहेत.