
हिंदुस्थानी वंशाचे काश पटेल यांच्या अमेरिकेतील एफबीआय अर्थात फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या गुप्तचर संस्थेच्या संचालक पदावरील नियुक्तीला अमेरिकन सिनेटने मंजुरी दिली. काश पटेल यांच्या बाजूने 51 मते, तर विरोधात 49 मते पडली. पटेल यांनी यापूर्वी डिफेंडर आणि न्याय विभागात दहशतवादविरोधी वकील म्हणून काम केले आहे. एफबीआय संचालक म्हणून त्यांचा कार्यकाळ 10 वर्षांचा असणार आहे.