अमेरिकेत ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह…, हिंदुस्थानी वंशाच्या अमनदीप सिंगला 25 वर्षांची शिक्षा

हिंदुस्थानी वंशाच्या अमनदीप सिंग याला अमेरिकन न्यायालयाने ड्रंक आणि ड्राईव्हप्रकरणी 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. अमनदीप सिंगने दारू पिऊन गाडी चालवल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. शिक्षेची सुनावणी सुरू असताना पीडितांच्या समर्थकांनी न्यायालयात मोठी गर्दी केली.

बांधकाम अधिकारी अमनदीप सिंग अमेरिकेत राहतो. अमनदीपवर दारूच्या नशेत ताशी 150 किलोमीटर वेगाने गाडी चालवल्याचा आरोप होता. मे 2023 मध्ये न्यूयॉर्पच्या लाँग आयलंडवर हा अपघात झाला होता. अपघातात 14 वर्षांच्या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर मिनेओला न्यायालयाने अमनदीपला कठोर शिक्षा सुनावली. अमनदीपने आपली चूक मान्य केली. एखाद्याचे मूल गमावणे हे सर्वात मोठे दुःख आहे, असेही अमनदीपने या वेळी म्हटले.

न्यायालयात गर्दी आणि संताप

शिक्षेची सुनावणी सुरू असताना पीडितांच्या समर्थकांनी न्यायालयात मोठी गर्दी केली होती. पीडित मुलाच्या मित्रांनी, शेजारी आणि पुटुंबीयांनी संताप व्यक्त केला.  या वेळी अमनदीप सिंगने न्यायालयात आपल्या पृत्याबद्दल माफी मागितली. तसेच सगळी माझी चूक होती असेही मान्य केले.