
हिंदुस्थानी नौदलाच्या आयएनएसव्ही तारिणीने दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये प्रवेश केला. या मोहिमेतील उजव्या बाजूची लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि डावीकडील लेफ्टनंट कमांडर रूपा ए या दोन महिलांनी कठीण परिस्थितीवर मात हा टप्पा गाठून इतिहास रचला आहे. आयएनएसव्ही तारिणीचा प्रवास 2 ऑक्टोबर 2024 पासून गोव्यातून सुरू झाला होता. हिंदुस्थानी नौदलाचे प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला होता. या दोन्ही रणरागिणींनी या मोहिमेत आठ महिन्यांत समुद्रातून 43,300 किलोमीटरचा प्रवास केला. आयएनएसव्ही तारिणी आता 15 एप्रिल 2025 पासून केपटाऊनहून पुढील प्रवासासाठी निघणार आहे.