ड्रग्ज तस्करीवर नौदलाचा फास

समुद्रातून अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी हिंदुस्थानी नौदलाने 2017 पासून मिशन डेप्लॉयमेंट सुरू केले. अरबी समुद्र, हिंद महासागर आणि बंगालच्या खाडीत एक जबरदस्त चक्रव्यूह रचले आहे. हे चक्रव्यूह तोडणे समुद्री चांच्यांसाठी सोपे नाही. नौदलाने पश्चिम हिंद महासागरात तब्बल 2500 किलोचे नाकाxटिक्स पकडले आहे. या ठिकाणी एअरक्राफ्ट पी-9-आय ने संशयित बोटसंबंधी माहिती देताच फ्रंट लाइन फ्रीगेट आयएनएस तरकशने ही मोहीम राबवून बोटीतील 2500 किलो नाकाxटिक्स जप्त केले. यात 2386 किलो हशीश आणि 121 किलो हेरोईनचा समावेश आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात कोटय़वधी रुपयांची किंमत आहे.