
हिंदुस्थानी नौदलाने आपल्या स्टील्थ फ्रिगेट आयएनएस तरकशसोबत रॉयल न्यूझीलंडच्या नौदलाच्या एजँग क्लास फ्रिगेटसोबत पासेक्समध्ये भाग घेतला. हिंद महासागरात झालेल्या अभ्यासात क्रॉस डेक लँडिंग, क्रॉस बार्डिंग, सी रायडर एक्सचेंज आणि सामरिक युद्धाभ्याससह अनेक प्रकारचे इंटरऑपरेबिलिटी अभ्यासाचा समावेश होता. दोन्ही देशांनी समुद्रातील सहकार्य आणखी मजबूत करणे आणि इंटरऑपरेबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले.