कॅनडामध्ये हिंदुस्थानी नागरिकाची चाकू भोसकून हत्या, संशयिताला अटक

विदेशामध्ये हिंदुस्थानी नागरिकांवर हल्ले आणि हत्यांचे सत्र सुरुच आहे. शनिवारी सकाळी कॅनडातील ओटावाजवळील क्लेरेन्स-रॉकलँड परिसरात एका हिंदुस्थानी नागरिकाची चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. कॅनडातील हिंदुस्थानी दूतावासाने एक ट्विट करत ही माहिती दिली आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटकही करण्यात आली आहे.

‘ओटावाजवळील क्लेरेन्स-रॉकलँड येथे एका हिंदुस्थानी नागरिकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची दु:खद घटना घडली. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आम्ही पीडिताच्या कुटुंबाच्या संपर्कात असून त्यांना सर्वोतोपरी मदत मिळेल’, असे ट्विट कॅनडातील हिंदुस्थानी दूतावासाने केले आहे.