अमेरिकेत कारच्या धडकेत हिंदुस्थानी मुलीचा मृत्यू

अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या एका हिंदुस्थानी मुलीचा टेक्सास येथे कारच्या धडकेत मृत्यू झाला. व्ही. दीप्ती असे या तरुणीचे नाव असून ती आंध्र प्रदेशातील गुंटूरची रहिवाशी होती. बीटेकचे शिक्षण घेतल्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेली होती. 15 एप्रिल रोजी भरधाव ट्रकच्या धडकेत दीप्तीचा मृत्यू झाला. तिची मैत्रीण स्निग्धा हीसुद्धा या अपघातात गंभीर जखमी झाली. तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. शनिवारी तिचा मृतदेह अमेरिकेहून हिंदुस्थानकडे पाठवला जाणार असून सोमवारी हैदराबादला पोहोचेल, असे तिचे वडील हनुमंथ राव यांनी सांगितले.