एखाद्या रानगव्याने सिंहाला धोबीपछाड दिलेली तुम्ही कधी पाहिली आहे का? रानगव्याची ताकद आणि धाडस दाखवणारा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाले आहे. या व्हिडिओत सिंह आपल्या भक्ष्याच्या शोधात फिरत असतो. त्यावेळी त्याची नजर एका रानगव्यावर पडते. त्यानंतर संधी पाहून तो त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करतो. पण, त्याला रानगव्याच्या ताकदीचा अंदाज नसतो.सिंह रानगव्यावर हल्ला चढवणार इतक्यात रानगवा सिंहाला पायात पकडतो. दोघांमध्ये जोरदार
झुंज पहायला मिळते. या झुंजीत सिंहच जिंकेल असे वाटत असतानाच सिंहावरील रानगव्याची पकड सैल होते.सिंह जमिनीवर पडतो आणि पळू लागतो. रानगवा इतक्यावरच थांबत नाही. तो सिंहाचा पाठलाग करून त्याला दूरवर पळवून लावतो. हा अवघ्या १२ सेकंदांचा व्हिडिओ असून एका एक्स युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ ५९ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.