चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकड्यांचं नापाक कृत्य; लाहोरच्या गद्दाफी मैदानावरून तिरंगा गायब, Video व्हायरल

चॅम्पियन्स ट्रॉफी अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. आयसीसीची ही स्पर्धा यंदा पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळली जाणार आहे. या स्पर्धेकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष असतानाच पाकिस्तानने एक घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्याआधीच वातावरण तापले आहे. लाहोरमधील गद्दाफी मैदान आणि कराचीतील नॅशनल मैदानावरून हिंदुस्थानचा तिरंगाच गायब झाल्याचे उघड झाले आहे. स्पर्धेत सहभागी इतर संघांचे झेंडे मैदानावर फडकत आहेत, मात्र हिंदुस्थानचा तिरंगाच गायब झाला आहे. यामुळे क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचे झेंडे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहेत. मात्र हिंदुस्थानचा तिरंगा गायब आहे, सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुस्थानी चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. अर्थात मैदानावर तिरंगा का लावण्यात आला नाही यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र हिंदुस्थानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. हिंदुस्थानचे सर्व सामना दुबईत खेळले जाणार आहे. त्यामुळे पाकिस्तानने असे घृणास्पद कृत्य केले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी वेळापत्रक

‘अ’ गट – हिंदुस्थान, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश
‘ब’ गट – दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड

दिनांक         सामना          (ठिकाण)

19 फेब्रुवारी पाकिस्तान वि. न्यूझीलंड (कराची)

20 फेब्रुवारी हिंदुस्थान वि. बांगलादेश (दुबई)

21 फेब्रुवारी अफगाणिस्तान वि. द.आफ्रिका (कराची)

22 फेब्रुवारी ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड (लाहोर)

23 फेब्रुवारी हिंदुस्थान वि. पाकिस्तान (दुबई)

24 फेब्रुवारी बांगलादेश वि. न्यूझीलंड (रावळपिंडी)

25 फेब्रुवारी ऑस्ट्रेलिया वि. द.आफ्रिका (रावळपिंडी)

26 फेब्रुवारी अफगाणिस्तान वि. इंग्लंड (लाहोर)

27 फेब्रुवारी पाकिस्तान वि. बांगलादेश (रावळपिंडी)

28 फेब्रुवारी अफगाणिस्तान वि. ऑस्ट्रेलिया (लाहोर)

1मार्च द.आफ्रिका वि. इंग्लंड (कराची)

2 मार्च हिंदुस्थान वि. न्यूझीलंड (दुबई)

4 मार्च उपांत्य फेरी – 1 (दुबई)

5 मार्च उपांत्य फेरी -2 (लाहोर)

9 मार्च अंतिम सामना

ICC Champions Trophy 2025 – हिंदुस्थानला ‘चॅम्पियन्स’ होण्याची संधी