पाकिस्तानच्या तुरुंगात हिंदुस्थानी मच्छीमाराने मृत्यूला कवटाळले; शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही मुक्तता नसल्याने उचलले टोकाचे पाऊल

पाकिस्तानच्या सागरी हद्दीत काही हिंदुस्थानी मच्चीमार चुकून जातात. तसेच काही पाकिस्तानी मच्छीमार चुकून हिंदुस्थानी हद्दीत येतात. त्यांनी सागरी सुरक्षा दलाकडून ताब्यात घेण्यात येते. तसेच दोन्ही देश चुकून एकमेकांच्या सागरी हद्दीत गेलेल्या मुच्छीमारांची मुक्तता करतात. पाकिस्तानातील मलीर तुरुंगात एका हिंदुस्थानी मच्छीमाराने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही मुक्तता होत नसल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर सर्व मच्छीमारांना त्यांच्या घरी पाठवण्यात यावे, अशी मागणी पत्रकार आणि शांततावादी कार्यकर्ते जतीन देसाई यांनी केली आहे.

हिंदुस्थानातील एका मच्छिमाराने पाकिस्तानच्या कराची येथील मलीर तुरुंगात आत्महत्या केली. ही बाब अतिशय गंभीर आहे. यापूर्वी असं कधीही घडलं नव्हतं. सुमारे 53 वर्षाच्या या मच्छीमाराची 2022 मध्ये पाकिस्तानच्या मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सीने अटक केली होती. त्याच वर्षी त्याची शिक्षा पण पूर्ण झाली होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. कंटाळलेल्या मानसिक अवस्थेत त्यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर देखील घरी जाता येत नसल्याचं दुःख कराची येथील तुरुंगातील सर्व भारतीय कैद्यांना आहे.आतातरी या सर्व मच्छीमारांना तत्काळ त्यांच्या घरी पाठवण्यात आले पाहिजे, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.