पाच दिवस कार्यालयात येऊन काम करण्यास नकार; ऑफिसला जाण्यासाठी कष्टाचे पैसे खर्च का करू?

लंडनमध्ये काम करणाऱ्या एका हिंदुस्थानी महिला कर्मचाऱ्याने आठवडय़ातील पाच दिवस कार्यालयात येऊन काम करण्यास नकार दिला आहे. तरुणा विनायकिया असे या महिलेचे नाव आहे. कोविड काळात वर्क फ्रॉम होमची सवय लागलेल्या अनेक कर्मचारी ऑफिसमध्ये येऊन काम करण्यास टाळाटाळ करत आहेत. लंडनच्या महागडय़ा वाहतूक व्यवस्थेने ऑफिसला ये-जा करण्यासाठी मी माझ्या कष्टाने कमावलेले पैसे खर्च करणार नाही, असे सांगत या महिलेने कार्यालयात येऊन काम करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.

या महिलेने लिंक्डइनवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये महिलेने म्हटले की, मला कार्यालयात येऊन चार ते पाच दिवस काम करणे शक्य होणार नाही. मी 25 वर्षांची आहे. लंडनमध्ये राहते, परंतु सध्याचा खर्च मला परवडत नाही. पगाराच्या जिवावर मी घर घेऊ शकत नाही. कार्यालयात रोज गेले तर आणखी खर्च वाढेल. त्यामुळे मी कार्यालयात जाऊन काम करू शकत नाही, असे महिलेने म्हटले.