टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मोहम्मद सिराज त्याच्या उत्तम खेळीमुळे चर्चेत असतोच मात्र, आता तो वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय बनला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात झनाई आणि मोहम्मद सिराजचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे या दोघांच्या डेटिंगची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. मात्र, या चर्चांना झनाई भोसलेने पूर्णविराम दिला आहे.
नुकताच झनाई भोसलेने आपला 23 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. यामध्ये मोहम्मद सिराजही सहभागी झाला होता. झनाई भोसलेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वाढदिवसाच्या पार्टीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती आशा भोसलेसोबत केक कापताना दिसली. याशिवाय ती अनेक स्टार्ससोबतच्या फोटोंमध्ये दिसली. मात्र सिराजसोबतच्या फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
View this post on Instagram
सिराज आणि झनाई एकमेकांशी हसत हसत बोलत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यावर अनेकांनी हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. झनाईने शेअर केलेल्या पोस्टच्या कमेंटमध्ये लोकांनी अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तुम्ही सिराज भाईजानसोबत लग्न करणार आहात का? असे प्रश्न अनेक युजर्सनी विचारले. या प्रश्नांवर झनाईने मौन सोडले आहे.
झनाईने सिराजसोबत फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला असून त्यावर मेरा प्यारा भाई असे कॅप्शन लिहिले आहे. तर सिराजनेही झनाईची इन्स्टास्टोरी पुन्हा शेअर केली आहे. त्यामुळे झनाई आणि सिराजच्या डेटिंगच्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे.