PHOTO – हिंदुस्थानी वंशाच्या गायिका चंद्रिका टंडन ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित

हिंदुस्थानी अमेरिकन गायिका आणि उद्योजिका चंद्रिका टंडन यांना नुकतेच ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टंडन यांना त्रिवेणी या त्यांच्या बेस्ट न्यू एज, अँबियंट किंवा चांट अल्बमसाठी पुरस्कार देण्यात आला. लाॅस एंजेलिसमध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चंद्रिका टंडन यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी हा पुरस्कार जिंकला आहे. मुख्य म्हणजे ग्रॅमीच्या पूर्ण कार्यक्रम सोहळ्यात सर्वात चर्चा होती ती, चंद्रिका यांच्या कपड्यांची. हिंदुस्थानी पंजाबी ड्रेसचा पेहराव केल्यामुळे चंद्रिका यांनी उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्यासाठी मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेले आऊटफिट चंद्रिका टंडन यांनी घातले होते.

पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रा नुई या चंद्रिका यांची मोठी बहिण आहे. चेन्नईमध्ये चंद्रिका यांचा जन्म झाला असून, त्यांनी जिंकलेल्या या पुरस्कारामुळे हिंदुस्थानातही आनंदाचे वातावरण आहे.