
हिंदुस्थानी वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे 29 मे रोजी अंतराळात झेप घेणार आहेत. अमेरिकेची स्पेस एजन्सी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (नासा), हिंदुस्थानी अंतराळ विज्ञान संघटन (इस्रो) आणि युरोपीय अंतराळ एजन्शी (ईएसए) यांनी मिळून स्पेस मिशन ऍक्सिओम 4 हे मिशन जाहीर केले होते. आता या मिशनची तारिख ठरली असून 29 मे रोजी ते उड्डाण घेणार आहेत.
हिंदुस्थानी वायू दलाचे ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशू शुक्लाच्या रुपाने चार दशकानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर पाठवण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. शुभांशू शुक्ला यांच्याकडे 2 हजार तासांहून अधिक अत्याधुनिक विमाने चालवण्याचा अनुभव आहे. यामध्ये सुखोई-30 एमकेआय, मिग 21, मिग 29, जॅग्कॉर, हॉक या विमानाचा समावेश आहे.
अंतराळ मिशनवर चौघे जाणार
हिंदुस्थानी वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे या मिशनचे पायलट असतील. ते पहिल्यांदा अंतराळात जात आहेत. पोलंडचे अंतराळवीर स्लावेज उज्नान्सकी हे या मिशनचे स्पेशलिस्ट असतील. हंगरीचे टिबोर कापू मिशनचे स्पेशलिस्ट असतील. अमेरिकेचे पैगी व्हिटसन यांच्याकडे मिशनची कमांड असेल.