Photo – पुण्यात भारतीय सैन्याचे शस्त्र प्रदर्शन, नागरिकांची गर्दी

भारतीय सैन्याच्या वतीने “ नो युअर आर्मी’ 2025” हा तीन दिवसांचा कार्यक्रम रेसकोर्स पुणे येथे आयोजित केला आहे. यामध्ये सशस्त्र दलांचे सामर्थ्य, तांत्रिक प्रगती आणि स्वदेशी क्षमता पाहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम 03 जानेवारी ते 5 जानेवारी 2025 या कालावधीत RWITC (रेस कोर्स मैदान), पुणे येथे दररोज सकाळी 09:00 ते साय 05.00 दरम्यान आयोजित केला आहे. या प्रदर्शनात लष्करी उपकरणे आणि तंत्रज्ञानाची श्रेणी दाखवली जाणार आहे. हा कार्यक्रम स्वातंत्र्यानंतर तब्बत 77 वर्षांनी प्रथमच पुण्यात आयोजित केला आहे. यामध्ये भारतीय लष्कराच्या ऑनपरेशनल क्षमतेची अनोखी झलक पाहायला मिळणार आहे.

फोटो – चंद्रकांत पालकर