हिंदुस्थानी वायूदलाची ’पॉवर’ वाढणार; 114 लढाऊ विमाने खरेदीची तयारी, शत्रूला ‘जशास तसे’ उत्तर 

हिंदुस्थानी वायूदल 114 नवीन लढाऊ विमाने खरेदीची तयारी करत आहे. यासाठी 2025 च्या अखेरपर्यंत किंवा 2026 च्या सुरुवातीला आरपीएफ जारी केले जाईल. सध्या अन्य देशांच्या तुलनेत हिंदुस्थानच्या वायूदलाची पॉवर कमी आहे. ती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हिंदुस्थानी वायूदलात 42 फायटर स्क्वाड्रन असायला हवेत. परंतु, वायूदलाकडे केवळ 30 आहेत. एका स्क्वाड्रनमध्ये 18 विमाने असतात. सध्या वायूदलाकडे कमी शस्त्रसाठा आहे. त्यामुळे सुरक्षेवरून चिंता वाढत आहे.

वायूसेनेच्या प्रमुखांनी स्वतः याविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यासाठी जवळपास 20 बिलियन डॉलरचा एमआरएफए प्रोग्राम भारतच्या वायूदलाला प्रोत्साहन देण्यासाठी खास मानला जात आहे. त्यामुळे वायूदलात 114 लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी मल्टी रोल फायटर एअरक्राफ्ट प्रोग्राम चालवले जाईल. या प्रोग्राम अंतर्गत संभावित सप्लायर्सला 2025 च्या अखेरपर्यंत किंवा 2026 च्या सुरुवातीला रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरपीएफ) जारी केले जाईल. विशेष म्हणजे उच्च स्तरांवरील समितीने वायूदलासाठी लवकरात लवकर नवीन विमाने खरेदी करण्याची शिफारस केली होती. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रोजेक्टला लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कमिटीने केवळ मंजुरी देण्याची शिफारस केली आहे. या प्रक्रियेसाठी कमीत कमी तीन ते चार वर्षं लागतील. एकदा मंजुरी मिळाली की लढाऊ विमानाची खरेदी करता येईल.

कंत्राट मिळवण्यासाठी मोठ्या कंपन्या मैदानात

आरएफपी जारी केल्यानंतर थेट फ्लाईटची चाचणी केली जाईल. या चाचणीतून समजेल की, विमान हिंदुस्थानी हवाई दलाची गरज पूर्ण करते की नाही. या चाचणीच्या आधारावर वायूसेना केवळ दोन वेंडर्सला शॉर्टलिस्ट करेल. त्यामुळे या प्रस्तावांची संख्या कमी होईल. हे कंत्राट मिळावे यासाठी अनेक कंपन्या मैदानात आहेत. यात दसॉल्ट राफेल (फ्रान्स), बोइंग एफ-ए-18 सुपर हॉर्नेट (यूएसए), लॉकहिड मार्टिन एफ-21 (यूएसए) या कंपन्यांचा समावेश असेल.