स्वातंत्र्य सैनिकाला आदरांजली

1857 मधील स्वातंत्र्य सैनिक बाबू वीर कुंवर सिंह यांच्या जयंतीनिमित्त अर्थात शौर्य दिनानिमित्त मंगळवारी पटणा येथील जेपी गंगा पथवर हिंदुस्थानी वायुदलाकडून एक आगळीवेगळी आदरांजली वाहण्यात आली. त्यांचा फोटो असलेले बॅनर उंच आकाशात फडकवण्यात आले. उद्या सूर्यकिरण एअरोबेटिक टीमकडून एअर शो आयोजित करण्यात येणार आहे. त्याची आज रंगीत तालीम करण्यात आली. हिंदुस्थानी हवाई दलाच्या चित्तथरारक कसरती पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते.